Home > News Update > भाजपच्या श्रीकांत देशमुख विरोधात बलात्काराचा गुन्हा

भाजपच्या श्रीकांत देशमुख विरोधात बलात्काराचा गुन्हा

भाजपच्या श्रीकांत देशमुख विरोधात बलात्काराचा गुन्हा
X

भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुख यांच्या विरोधात एका महिलेने आरोप केले होते. त्यानंतर श्रीकांत देशमुख यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.

याबाबत एका महिलेने डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर श्रीकांत अप्पासाहेब देशमुख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीत महिला पुण्यातील आहे. देशमुख यांची महिलेशी ओळख झाली होती. त्या वेळी गे ल्या तीन वर्षांपासून पत्नीशी मतभेद झाले आहेत. त्यामुळे पत्नीला लवकरच घटस्फोट देणार असल्याची बतावणी देशमुख यांनी महिलेकडे केली होती. त्यानंतर देशमुख यांनी बलात्कार केल्याचे पीडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

देशमुख यांनी महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास महिला तसेच तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. डेक्कन पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

Updated : 18 July 2022 7:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top