मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजपाने पुढाकार घ्यावा – अॅड हेमा पिंपळे
X
महाराष्ट्र सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यानंतर राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. अॅड हेमा पिंपळे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून ५२ मूक मोर्चे अत्यंत संयमाने काढण्यात आले होते याची नोंद गिनीज बुकातही झाली. तसेच यात ४२ मराठा बांधवाचा मृत्यूही झाला होता. न्यायमूर्ती गायकवाड यांचा ९ सदस्यीय मागासवर्गीय आयोग होता. याच गायकवाड समितीच्या शिफारसीवरून मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवलं गेलं. परंतु सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण अवैध ठरवण्यात आलं आहे. आता भाजपाने पुढाकार घेत मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं असं पिंपळे यांनी म्हटलं आहे.
त्याच पुढे ते सांगतात की,
महाराष्ट्रात ३२.१४ टक्के मराठा समाज आहे. त्यामध्ये फक्त ६ टक्के मराठा समाजातील लोकांना शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्या आहेत. मराठा समाजात ७.३ टक्के लोक उच्चशिक्षित असून केवळ ४.३ टक्के शैक्षणिक पदावर त्यांच प्रतिनिधित्व आहे. तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात गायकवाड समिती गठित केली. महाराष्ट्रात सर्वे करून गायकवाड समितीने दिलेल्या अहवलानुसार शैक्षणिक, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या मराठा समाज मागासलेला आहे. त्यामुळे १६ टक्के आरक्षण मराठा समाजाला देणं गरजेच आहे. एसीबीसीच्या सवलतीसुद्धा मराठा समाजाला देणं गरजेचं असल्याच मुंबई उच्च न्यायालयाने ही म्हटलं होत परंतु सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे.असं अॅड हेमा पिंपळे यांनी म्हटलं आहे.