शेतकरी आंदोलनावर विरोधकांची आगपाखड
X
देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेवर दोन महीन्यापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याची आज देशाच्या आर्थिक राजधानीत मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकरी कामगार आंदोलनाचा एल्गार पुकारला असताना विधानसभा आणि विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी शेतकऱ्यांची काही राजकीय पक्षांकडून दिशाभुल होत असल्याचा आरोप केला आहे.
नाशिकमधून हजारो शेतकऱ्यांना मुंबईच्या दिशेने कुच करत आझाद मैदानात ठिय्या आंदोलन केले आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या आंदोलनात सहभागी होत पाठींबा जाहीर केला.
महाराष्ट्रात कृषी विधेयक येऊन इतके दिवस झाले. कुठलंही आंदोलन महाराष्ट्रात झाले नाही. काही पक्ष जाणीवपूर्वक ढोंगबाजी करत आहेत, शेतकऱ्यांना गुमराह करण्याचा प्रयत्न करत आहेत, शेतकऱ्यांना चुकीच्या गोष्टी सांगण्यात येत आहेत,आणि आता जे लोकं या मोर्चाच्या निमित्ताने मंचावर जात आहेत त्यांना माझा सवाल आहे, काँग्रेस पक्षाने आपल्या २०१९ च्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर बाजारसमित्या रद्द करू त्यांनी आता उत्तर दिलं पाहिजे,असं मत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे.
आझाद मैदानावर आंदोलन करणारे शेतकरी राजभवनावर जाणार आहेत. राज्यपालांना हे कृषीकायदे रद्द करावे,अश्या आशयाचे निवेदन ते राज्यपालांना देणार आहेत.आझाद मैदान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. यावर प्रतिक्रिया देत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी,शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन चिगळवण्याचा प्रयत्न होतोय,पूर्ण पणे शेतकऱ्यांच्या विषयी ढोंग या मंडळींचं सुरू असल्याचे सांगितले आहे. शेतकरी आंदोलना मुंबईत मोठा प्रतिसाद मिळत असताना भाजप नेत्यांनी मात्र आंदोलनात सहभागींविरोधात आगपाखड केली आहे.