Home > News Update > UP Election 2021 : नाईट कर्फ्यूवरून वरूण गांधींचा स्वपक्षाला घरचा आहेर

UP Election 2021 : नाईट कर्फ्यूवरून वरूण गांधींचा स्वपक्षाला घरचा आहेर

ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रसारामुळे योगी सरकारने नाईट कर्फ्यू घोषीत केला आहे. यावरून भाजपा खासदार वरूण गांधी यांनी स्वपक्षालाच घरचा आहेर दिला आहे. एकीकडे रात्री कर्फ्यू लावायचा आणि दिवसा निवडणूक प्रचारासाठी लाखो लोकांची गर्दी बोलवायची, असं वरून गांधी यांनी म्हटले आहे.

UP Election 2021 : नाईट कर्फ्यूवरून वरूण गांधींचा स्वपक्षाला घरचा आहेर
X

उत्तरप्रदेशात विधानसभा (UP Election 2021) निवडणूकीचे पडघम वाजले आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा आणि काँग्रेससह सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे पंतप्रधानांपासून ते काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत सर्वच जण राजकीय प्रचारासाठी गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन करण्यात व्यस्त असताना दुसरीकडे ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रसारामुळे योगी सरकारने नाईट कर्फ्यू घोषीत केला आहे. यावरून भाजपा खासदार वरूण गांधी (MP Varun Gandhi) यांनी स्वपक्षालाच घरचा आहेर दिला आहे.

वरूण गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, रात्री कर्फ्यू (Night Curfew) लावायचा आणि दिवसा निवडणूक प्रचारासाठी लाखो लोकांची गर्दी बोलवायची, हे समजण्यापलिकडेचे आहे. तसेच उत्तरप्रदेशच्या आरोग्य सुविधांची मर्यादा लक्षात घेऊन आता आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे ओमिक्रॉनचा धोका रोखणे आवश्यक आहे की राजकीय सभांना गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन करणे जास्त महत्वाचे आहे, हे आता आपल्याला ठरवावे लागेल. आपल्याला आपल्या प्राथमिकता निश्चित कराव्या लागतील, असे मत वरूण गांधी यांनी ट्वीट करून मांडले.

नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या (Omicron Varient) पार्श्वभुमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) व पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister) यांनी राज्यातील शक्तीप्रदर्शनावर बंदी घालण्याचे आवाहन केले होते. तसेच शक्य असेल तर निवडणूक पुढे ढकलण्याचा सल्लाही अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Alahabad High Court) दिला होता. त्यानंतर ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभमीवर योगी (Yogi Adityanath ) सरकारने उत्तरप्रदेशात नाईट कर्फ्यू लावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वरूण गांधी केंद्र सरकारवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. शेतकरी आंदोलन, खासगीकरण यावरून वरूण गांधी यांनी स्वपक्षाला आहेर दिला होता. मात्र आता त्यानंतर नाईट कर्फ्यू आणि निवडणूकीतील शक्तीप्रदर्शनावरून वरूण गांधी यांनी सरकारला टीकेचे लक्ष बनवले आहे.

Updated : 28 Dec 2021 8:42 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top