Home > News Update > PMO बिनकामाचे, कोरोना परिस्थिती हाताळण्याचे काम गडकरींकडे द्या- सुब्रमण्यम स्वामी

PMO बिनकामाचे, कोरोना परिस्थिती हाताळण्याचे काम गडकरींकडे द्या- सुब्रमण्यम स्वामी

कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका होते आहे. पण आता भाजपच्या एका नेत्याने थेट PMO बिनकामाचे असल्याचे सांगत मोठी मागणी केली आहे.

PMO बिनकामाचे, कोरोना परिस्थिती हाताळण्याचे काम गडकरींकडे द्या- सुब्रमण्यम स्वामी
X

Subramanian Swamyदेशातील कोरोना परिस्थिती भयावह होण्यास मोदी सरकार जबाबदार असल्याची टीका संपूर्ण जगभरातून होत आहे. पण आता नरेंद्र मोदी यांना त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने घरचा आहेर दिला आहे. कोरोनाची भीषण परिस्थिती हाताळण्यास पंतप्रधान कार्यालय सक्षम नाही, त्यामुळे ही जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

स्वामी यांनी एक ट्विट केले आहे आणि त्या माध्यमातून ही टीका केली आहे. "इस्लामिक आणि ब्रिटीश आक्रमणांविरोधात ज्याप्रमाणे भारताने तोंड दिले तशाच प्रकारे कोरोनाविरोधात भारत लढा देईल. पण आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नाही तर कोरोनाच्या आणखी एका लाटेची भीती आहे, ज्यामध्ये लहान मुलांना सर्वाधिक धोका असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता या लढ्याची जबाबदारी नितीन गडकरींकडे द्यावी कारण या कामात पंतप्रधान मोदींचे कार्यालय बिनकामाचे ठरले आहे."

"आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना फ्री हँड द्या"

"याचा अर्थ मोदी सरकारमधील केवळ गडकरी हे एकमेव सक्षम मंत्री आहेत, असे आपल्याला म्हणायचे आहे का," असा सवाल एका नेटकऱ्याने स्वामींना विचारला. यावर, "तसे नाही डॉ.हर्षवर्धन यांना मोकळेपणाने काम करु दिले गेले नाही, हर्षवर्धन हे प्रामाणिकपणे काम करणारे आहेत, गडकरींच्या नेतृत्वाखाली ते चांगले काम करतील" असे स्वामी यांनी म्हटले आहे.

Updated : 5 May 2021 11:15 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top