अमिताभ बच्चन विरोधात भाजप आमदाराची पोलिसात तक्रार
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन यांच्यासह सोनी नेटवर्कच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
Admin | 3 Nov 2020 4:34 PM IST
X
X
सोनी टीव्ही वरील कार्यक्रमात 'कौन बनेगा करोडपती' मधील स्पर्धकांना अभिताभ बच्चन प्रश्न विचारत असतात. कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर अभिमन्यू पवार यांनी आक्षेप घेत सोनी टीव्ही आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अभिमन्यू पवार यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. या ट्विट मध्ये त्यांनी हिंदू धर्मीयांची भावना दुखावल्याचा आरोप बच्चन यांच्यावर केला आहे.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाद्वारे हिंदू धर्मीयांची भावना दुखावल्याबद्दल तसेच अत्यंत सलोख्याने राहणार्या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल महानायक श्री अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क विरोधात तक्रार नोंदवली. ३० ऑक्टोबर २०२० रोजी प्रसारित झालेल्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात "२५ डिसेंबर १९२५ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसोबत कोणत्या धर्मग्रंथाच्या प्रति जाळल्या?" असा प्रश्न विचारला.
आपल्या देशात अनेक धर्म असतानाही प्रश्नाखालील सर्वच्या सर्व पर्याय जाणीवपूर्वक हिंदू धर्माशी निगडितच देण्यात आले. अशा कृतीतून हिंदू धर्मग्रंथ हे जाळण्यायोग्यच असल्याचा संदेश देण्याचा तसेच जवळपास १ शतकापूर्वीची घटना चर्चेत आणून गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा खोडसाळ प्रयत्न लपून राहत नाही.
Updated : 3 Nov 2020 4:34 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire