भाजपच्या एका आमदाराला आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस
X
भाजपच्या विरोधकांना ईडीची नोटिसांचे सत्र सुरू असतानाच आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावली आहे. मुंबई महापालिकेतील एका भ्रष्टाचार प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. साधारण 20 दिवसांपूर्वी त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांनतर आता प्रसाद लाड यांची चौकशी होणार आहे.
प्रसाद लाड यांनी 2009 साली मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी 2014 साली त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी म्हणून प्रसाद लाड ओळखले जातात. दरम्यान प्रसाद यांनी हे आरोप फेटाळले असून सूडाचे राजकारण केले जात आहे असा आरोप केला आहे. इतके दिवस महाविकास आघाडी सरकार झोपले होते का, असा सवालही त्यांनी विचारला आहे.