चिपी विमानतळाच्या उदघाटनावरून भाजप नेते प्रसाद लाड यांची सरकारवर टीका
X
सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळ ७ ऑक्टोबरला सुरू करणार असल्याचं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले यावरून आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकारण तापताना पहायला मिळत आहे. चिपी विमानतळाच्या बाबत यावेळी सुद्धा सिंधुदुर्ग वासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम शिवसेना आणि महाविकास आघाडीच सरकार करत आहे अशी टीका प्रसाद लाड यांनी कणकवलीत केली आहे.
चिपी विमानतळाच्या उदघाटनावरून भाजप नेते प्रसाद लाड यांची सरकारवर टीका केली आहे. सिंधुदुर्गातील शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री वेळोवेळी कोकणातील लोकांची दिशाभूल करत आले आहेत. मग निसर्ग चक्रीवादळ असेल ,तौक्ते वादळ असेल किंबहुना कोविडच्या काळातील संकट असेल. चिपी विमानतळाच उदघाटन व्हावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे.पण यावेळी ही कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम शिवसेना आणि महाविकास आघाडीच सरकार करेल.
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळात बनावट नोटा आढळल्या. कुडाळ भाजी मार्केटच्या बाहेर प्लॅस्टिक पिशवीत बांधून ठेवलेल्या नोटा आज पहाटेच्या सुमारास निदर्शनास आल्या. जवळजवळ चार लाख रकमेच्या या नोटा असून सर्व नोटा डुप्लिकेट आहेत. गणेश उत्सव तोंडावर असताना जिल्ह्यात मोठी आर्थिक उलाढाल होत असताना बनावट नोटा आढळल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. कुडाळ पोलिसांनी नोटा जप्त केल्या असून पुढील तपास सुरू आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव काळात येणाऱ्या चाकरमान्यांना कोरोनाचे निर्बंध लावण्यात येत आहेत. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काल कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्यात येणार नसल्याचं सांगितले. परंतु मी कुडाळ रेल्वे स्टेशनला उतरलो तेव्हा दोन डोस घेतलेल्याचं प्रामाणपत्र किंवा RTPCR निगेटिव्ह अहवाल दाखवणं बंधनकारक आहे. कोकणवासीयांच्या केवळ मतासाठी वापर केला जातो. मात्र काही देताना कोकणवासीयांवर वेगवेगळे नियम लादले जातात. त्याचा मी निषेध करतो. सणासुदीच्या काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना आनंदाने उत्सव करण्याचे परवानगी सरकारने द्यावी असं प्रसाद लाड म्हणाले.