शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, राणे सोशल मीडियावर ट्रोल....
शेतकरी आंदोलन राणेंची सोशल मीडियावर उडवली जातेय जोरदार खिल्ली, पाहा काय म्हटलंय नेटीझन्सनी
X
राहुल गांधी, उद्धव ठाकरेंना शेतीतलं काय कळतं? असा सवाल करत भाजप नेते नारायण राणे यांनी केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याला समर्थन देण्यासाठी सिंधुदुर्गात ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली होती.
दिल्ली सुरू असलेलं आंदोलन राजकीय आहे. राहुल गांधींना शेतीतलं काय कळतं. ते काय बोलतात हे त्यांना कळतं का? राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, त्यांना शेतीतलं काय कळतं? कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या का करतो? हे तरी यांना माहीत आहे का? असा सवाल करत राणे यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती.
मात्र, राणे यांचा या रॅली नंतर नेटीझन्सनी चांगलाच समाचार घेतला आहे. राणे यांनी या रॅलीचे फोटो फेसबूकवर अपलोड केले आहेत. त्यावर अनेक लोकांनी कमेंट करत राणेंची खिल्ली उडवली आहे.