'ठाकरे सरकार हे डाकू-माफियाचे सरकार आहे' -किरीट सोमय्या
X
कोल्हपूरमधील साखर कारखान्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करणाऱ्या भाजपचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा नगर जिल्ह्याकडे वळवला आहे. सोमय्या यांनी पारनेर साखर कारखाना विक्री प्रकरणी घोटाळा झाल्याचे म्हणत याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.दरम्यान पारनेर कारखाना बचाव कृती समितीच्यावतीने थेट ईडीकडे चौकशीची मागणी केली आहे.भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पारनेर येथील क्रांती शुगर कारखाना येथे भेट दिली.यावेळी त्यांनी क्रांती शुगर कारखान्याच्या शेतकरी सभासदांशी,कामगारांशी विविध प्रश्नांबाबात चर्चा केली, यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला , महाविकास आघाडी सरकार हे डाकू- माफियांचेे सरकार आहे म्हणूनच त्यांनी मला कोल्हापूरला जाण्यापासून रोखल्याचे ते म्हणाले.
सोबतच त्यांनी "पारनेर साखर कारखान्यात पवारांचे घनिष्ठ उद्योगपती मित्र यांनी २३ कोटी रुपये कसे टाकले? या सगळ्यांचे पुरावे माझ्या हातात आहेत. ईडीसोबत माझी चर्चा सुरू आहे. पारनेर साखर कारखान्याची आयकर विभाग, सहकार मंत्रालय आणि ईडी कडून चौकशी सुरू आहे. जरंडेश्वरनंतर पवार परिवारांशी संबंधित पारनेर साखर कारखान्याचा घोटाळ्याबाबत येत्या काही आठवड्यात कारवाई सुरू होणार." अशी माहिती यावेळी दिली.
पारनेर कारखान्यासाठी ज्या बिल्डरने पैसे दिले त्या बिल्डरने त्याच बँकेकडून कर्ज घेऊन पैसे दिले ज्या बँकेने या कारखान्याला नोटीस दिली .त्यामुळे याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे, वास्तविक कारखाना विकताना संबंधित व्यक्तीकडे एवढे पैसे होते का? ते पैसे त्याच व्यक्तीचे होते का? कारखाना विक्री करणाऱ्यांची त्याच व्यक्तीला कारखाना विकण्यामागे काय भूमिका होती? याची चौकशी होईल आणि सत्य काय ये बाहेर येईल असं सोमय्या म्हणाले.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील इतर भाजप नेत्यांच्या कारखान्यातील भ्रष्टाचार आणि इतर प्रकरणाबाबत आपली काय भूमिका असेल? या पत्रकारांच्या प्रश्नावर, "माझ्याकडे कोणी तक्रार घेऊन आले तर मी त्याची आधी संपूर्ण माहिती घेतो. त्या प्रकरणाचा अभ्यास करतो. त्याबाबत पुरावे संकलित करून त्याचा पाठपुरावा करतो. सामान्य माणसाच्या बाजूने मी नेहमी उभा राहतो. पारनेर कारखान्याच्या बाबतीतही बचाव समिती मला येऊन भेटली. याबाबत मला केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी लक्ष घालण्याची सूचना केली. त्यामुळे मी येथे आलो आहे. यामध्ये पक्षीय संबंध येत नाही" असे सोमय्या म्हणाले.
दरम्यान किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार असल्याची घोषणा यावेळी केली, सोबतच कोल्हापूरला जाण्यासाठी मी निघालो तेंव्हा मला गैरपद्धतीने ठाकरे सरकारने डांबून ठेवले असा आरोप करत मी कोल्हापूरला जाणार म्हणजे जाणारच असं त्यांनी म्हटले. दरम्यान सामनाच्या अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर झालेल्या टीकेबाबत पत्रकारांनी सोमय्या यांना विचारले असता ही ठाकरे-पवार सरकारची खेळी असून मुख्य मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा त्यांचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी सोमय्या यांनी पारनेर येथील शेतकरी सदस्य, कामगार, ग्रामंस्थाशी संवाद साधला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासातून समोर आलेल्या बाबी समोर ठेवल्या.यावेळी कारखाना बचाव समितीचे रामदास घावटे यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित हो