'विरोधकांकडे मुद्दे संपले कि ते महिलांच्या बाईपणाला व तिच्या परीवाराला टार्गेट करतात'- वाघ
X
अहमदनगर जिल्ह्यातील वनकुटे येथे एका कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांना जोरदार निशाणा साधला होता. ' आधी तुमच्या लाचखोर नवऱ्याला नीतिमत्ता शिकवा मग आम्हाला' असं म्हणत शेख यांनी वाघ यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे चित्रा वाघ आणि मेहबूब शेख आमने- सामने आल्याचे पाहायला मिळाले होते.
त्यातच चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत
'विरोधकांकडे मुद्दे संपले कि ते महिलांच्या बाईपणाला व तिच्या परीवाराला टार्गेट करतात' असं म्हणत विरोधकांवर सरसंधान साधलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,
'मला व माझ्या परीवारासाठी गलीच्छ भाषा वापरली जातीये तरी ही, मी कुणा परीवारातील सदस्यांना बलात्काऱ्याची बायको बलात्काऱ्याची मुलं म्हणून कधीही हिणवणार नाही कारण आमच्या बापाने हे आम्हाला शिकवलं नाही,विरोधकांकडे मुद्दे संपले कि तिच्या बाईपणाला व तिच्या परीवाराला टार्गेट केलं जातयं.
पण मला हे करण्याची आवश्यकता नाही माझ्याकडे सत्ताधाऱ्यांना गुद्दे द्यायला बरेचं मुद्दे आहेत
मला राज्यातील तमाम भगिनींना सांगायचयं…
या भ्याड भेकडांना भीक न घालता कणखर बना…अन्यायाविरोधात पेटून उठा मी तुमच्यासोबत आहे
आवाज उठवतीये व उठवत रहाणारचं…!! अशी पोस्ट चित्रा वाघ यांनी केली आहे.
काल देखील चित्रा वाघ यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटले होते की, 'वाघावर…..कोल्हे कुत्रे भुंकताहेत
कारण मी पिडीतांच्या पाठीशी उभी राहाते म्हणून
सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले आता माझ्या परीवाराची बदनामी सुरू. मी काय आहे काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या वाघ आहे मी लक्षात ठेवा, कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही'
अशी पोस्ट त्यांनी केली होती.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची भेट घेतल्यानंतर चित्रा वाघ यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात आली. या टीकेला वाघ यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.