'राज्याने दंडुकेशाही, मोगलाई, म्हणजे काय हे काल पाहिलं'- चंद्रकांत पाटील
X
राज्याने दंडुकेशाही, मोगलाई, म्हणजे काय हे काल पाहिलं , कायद्याची लढाई कायद्याने लढा, कोल्हापुरी चपलेने लढू नका असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
सोबतच यावेळी बोलताना त्यांनी हसन मुश्रीफ यांना पॅनिक होऊन काही होत नसतं असे म्हटले आहे.
भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केल्यानंतर ते कोल्हापूर येथे जाणार होते, मात्र कोल्हापूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना सुरक्षेचे कारण देत जिल्हाबंदी केली होती. त्यावरून भाजप चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं होतं. दरम्यान किरीट सोमय्या यांनी कराड येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार निशाणा साधला होता.
त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील पुण्यात पत्रकार परिषद घेत सरकारवर आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघात केला आहे.
सोलापूरमध्ये आमचे 2 आमदार होते आता 8 आमदार झाले, मुश्रीफ यांना झोपेच्या गोळी शिवाय माझे नाव पुरते असा टोलाही पाटील यांनी लगावला.
कायद्याची लढाई कायद्याने लढा, तुम्ही ईडीला उत्तर द्या 98 कोटीच्या फेक एन्ट्री कुठून आल्या, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अश्या गोष्टींना कधीही पाठींबा देणार नाही , या सरकारमध्ये पैसे खाण्याशिवाय काही कळत नाही.हे सरकार बे भरवशी सुरू आहे असं सांगताना हसन मुश्रीफ यांना भाजपची ऑफर नव्हती असं पाटील म्हणाले.
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या 'आमच्या जमिनी शोधण्यासाठी चंद्रावर मंगळावर जा' या व्यक्तव्याला उत्तर देताना , 'एक वेळ अशी येईल त्यांना पृथ्वी तलावर पाळायला जागा मिळणार नाही' असं पाटील यांनी म्हटले आहे.