Home > News Update > 'ठाकरे सरकारच्या हातात असते तर नवरात्री ही होऊ नये हाच त्यांनी प्रयत्न केला असता- आशिष शेलार

'ठाकरे सरकारच्या हातात असते तर नवरात्री ही होऊ नये हाच त्यांनी प्रयत्न केला असता- आशिष शेलार

ठाकरे सरकारच्या हातात असते तर नवरात्री ही  होऊ नये हाच त्यांनी प्रयत्न केला असता- आशिष शेलार
X

'ठाकरे सरकारच्या हातात असते तर नवरात्री ही होऊ नये हाच त्यांनी प्रयत्न केला असता असा प्रश्न पडतो' असा शब्दांत भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.अजूनही सरकारकडून काही निर्बंध ज्या पद्धतीने टाकले आहे त्यामध्ये हिंदू सण होताच कामा नये ,भाविकांना देखील दर्शनासाठी जाता येऊ नये आणि नवरात्रच्या काळात बंद करावा, जनतेचेचा रोष ठाकरे सरकारला दिसत नाही हे दुर्देवी आहे असं शेलार म्हणाले.आशिष शेलार हे ठाण्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या नवरात्र मंडळांना भेट देत असताना नवयुग नवरात्र मंडळ या ठिकाणी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना , आरक्षण हा मूलभूत अधिकार आहे आणि एका अर्थाने पदोन्नतीच्या आरक्षणाबाबत तत्कालीन भाजपाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षण टिकवण्यासाठी ठाकरे सरकारने कमी पडू नये अशी जनतेची भूमिका आहे.असं शेलार म्हणाले.

मावळमधील राष्ट्रवादीचा आमदार कोणाचा आहे ? याचा विसर शरद पवार यांना पडला आहे. मावळचे आमदार स्वबळावर निवडून आले नाही. आमच्याकडून बळ घेऊन तुम्ही निवडून आलात असा घणाघात त्यांनी केला.

मावळमध्ये शेतकऱ्यांवर घातलेल्या गोळ्या सरकारच्या आदेशानेच होत्या. शेतकऱ्यांमधील सरकार विरुद्ध रोष अजूनही संपलेला नाही. सरकारने घातलेल्या गोळ्याला जालिनवाला बाग हत्याकांड म्हणतात हे कदाचित पुन्हा आठवण करून देण्याची वेळ आलेली आहे असं शेलार म्हणाले. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलणे आशिष शेलार यांनी टाळले.

Updated : 13 Oct 2021 8:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top