"मुख्यमंत्री त्यांच्याच शब्दावरून फिरले?", भाजप नेते आशिष शेलार यांची राज्य सरकारवर टीका
मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या या निर्णयावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.
X
मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या या निर्णयावर भाजप नेते आशिष शेलार यांनी नंदुरबारमध्ये पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंसह राज्य सरकारवर टीका केली आहे.
"मुख्यमंत्र्यांनी जेव्हा कोकणाचा दौरा केला होता त्यावेळी त्यांनी पॅकेज न देता मदत करीन असं म्हणाले होते, मग मुख्यमंत्री त्यांच्या शब्दावरून फिरले का? सरकारने जाहिर केलेलं पॅकेज जेव्हा जनतेपर्यंत पोहोचेल तेव्हा खरं.. पुरग्रस्तांना तातडीची मदत अजूनही मिळालेली नाही तर पॅकेज चं काय?" असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
याशिवाय नवाब मलिक यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, "नवाब मलिक काही तरी बोलायचं म्हणून बोलतात सरकार काम करत नसल्याने राज्यपालांना हस्तक्षेप करावा लागत आहे. राज्यपाल नियमात राहून काम करत आहेत.
मुंबई विमानतळावर झालेल्या गोंधळाप्रकरणी देखील ते यावेळी बोलले. "विमानतळाचे हस्तांतरण राज्य सरकारने केलंय आणि आंदोलनदेखील शिवसेनाच करते आहे. विमानतळाचे व्यवस्थापन हस्तांतरण करीत असतांना अटी शर्ती का टाकल्या नाहीत. राज्य सरकार आणि अडाणी यांची मिलीभगत आहे. टक्के वारी साठी आंदोलन केलं गेलं असा आरोप यावेळी शेलार यांनी केला. आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रीया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.