Home > News Update > भाजप नेत्याच्या राजकिय संन्यासाने देशभर उडाली खळबळ

भाजप नेत्याच्या राजकिय संन्यासाने देशभर उडाली खळबळ

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकिय संन्यास घेतला आहे. त्यांनी त्यांच्या खासदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे बंगालच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

भाजप नेत्याच्या राजकिय संन्यासाने देशभर उडाली खळबळ
X

नवी दिल्ली : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकिय संन्यास घेतला आहे. त्यांनी त्यांच्या खासदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे बंगालच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एखाद्या नेत्याला पक्ष संघटनेबद्दल नाराजी व्यक्त करायची असेल तर तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो. मात्र, बाबुल सुप्रियो यांनी थेट राजकीय संन्यास घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मोदी सरकारमध्ये केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री म्हणून काम करणारे बाबुल सुप्रियो हे पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघातून सलग दोनवेळा निवडून आले आहेत. मात्र, बाबुल सुप्रियो मंत्री असताना भाजपला पश्चिम बंगालमध्ये सत्ता आणता आली नाही. एवढच काय तर ते स्वत: देखील टोलीगंज विधानसभा मतदारसंघातून 50 हजार मतांनी पराभूत झाले. स्वत: मंत्री असताना खासदार असताना देखील ते पराभूत झाले होते.त्यांच्या या पराभवानंतर त्यांना पक्षातून वेगळी वागणूक दिली जात असल्याचे बोललं जात होत त्यामुळेच त्यांनी राजकारणाच सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांची पुन्हा सत्ता मिळवली. त्यानंतर सुप्रियो यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहित होती. ममता सारख्या क्रूर महिलेला निवडून देऊन जनतेने ऐतिहासिक चूक केल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. एखाद्या महिलेबद्दल अनादर व्यक्त करणारी ही पोस्ट खुद्द भाजपच्या नेत्यांनाही आवडली नव्हती. त्यामुळे भाजपमधून देखील नाराजगी व्यक्त होत होती. त्यामुळेच सुप्रियो यांना पक्षातून वेगळी वागणूक दिली जात असल्याचं राजकिय जाणकारांचे मत होते. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

तर काही राजकिय विश्लेषकांनी मोदी सरकारच्या सरकारचा विस्तारात सुप्रियो यांचे मंत्रीपद गेल्याने त्यांनी संन्यास घेतल्याचे म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांशी मतभेद असल्याने राजीनामा दिल्याची देखील चर्चा आहे.

Updated : 1 Aug 2021 10:00 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top