एकरकमी FRP पुणे साखर संकुलवर भाजप किसान मोर्चाचे आंदोलन
टीम मॅक्स महाराष्ट्र | 29 Sept 2021 5:36 PM IST
X
X
पुणे : पुण्यातील साखर संकुलावर भाजपा किसान मोर्चाच्या वतीने एक रकमी एफआरपी मिळावी यासाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे .भाजपा किसान मोर्चाच्या वतीने ऊसाच्या एफआरपी (रास्त किफायतशीर किंमत) मध्ये तीन हप्त्याची शिफारस राज्य सरकारने केली. त्याचा निषेध म्हणून किसान मोर्चाच्या वतीने साखर संकूल कार्यालयासमोर निदर्शने किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासदेव काळे व मोर्चाचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी होते.
उस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर राज्य करतात आणि त्यांच्याच हक्काच्या पैशांवर कात्री लावतात हे सरकार शेतकऱ्यांचे कैवारी नाही शत्रू आहे असं यावेळी काळे यांनी म्हटले आहे.
ऊस ऊत्पादकांना सध्या आहे त्याप्रमाणेच ऊस टाकल्यावर १४ दिवसात पैसे मिळावेत. अन्यथा पुढील काळामध्ये भाजप किसान मोर्चाच्या वतीने मोठा आंदोलन उभा करू असा इशारा काळे यांनी दिला आहे.
Updated : 29 Sept 2021 5:36 PM IST
Tags: BJP Kisan Morcha
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire