भाजपला काँग्रेसपेक्षा 7 पट अधिक निधी मिळाला, काय सांगते आकडेवारी ?
X
भारतीय जनता पक्षाला 2022-23 मध्ये एकूण 1300 कोटी रुपयांचा निधी इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळाला आहे, तर काँग्रेसला या बाँडद्वारे केवळ 171 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. आज निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे.
भारतीय जनता पक्षाचा वार्षिक ऑडिट रिपोर्ट निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला होता, त्यानुसार भाजपचे एकूण उत्पन्न 2021-22 मध्ये ₹1,917 कोटींवरून 2022-23 मध्ये ₹2,361 कोटी झाले आहे.
भाजपने पुढे माहिती दिली आहे की 2022-23 मध्ये त्यांनी व्याजातून 237 कोटी रुपये कमावले आहेत, तर त्याशिवाय निवडणूक आणि प्रचारासाठी विमाने आणि हेलिकॉप्टरवर 78.2 कोटी रुपये खर्च केले आहेत.
यासह पक्षाने उमेदवारांना आर्थिक मदत म्हणून 76.5 कोटी रुपये दिले, तर भाजपने गेल्या वर्षी विविध राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये 1092 कोटी रुपये खर्च केले.
दुसरीकडे, राज्य-मान्यताप्राप्त समाजवादी पक्षाने 2021-22 मध्ये इलेक्टोरल बॉन्ड द्वारे 3.2 कोटी रुपये कमावले होते, तर 2022-23 मध्ये या बाँडमधून कोणतेही योगदान मिळाले नाही.