अनिल देशमुख राजीनामा द्या: केशव उपाध्ये
X
मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरून परमबीर सिंग (Prambir Singh) यांना हटवण्यात आल्यानंतर नाराज झालेल्या परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या संदर्भात परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं असून या पत्रात अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या ८ पानी पत्रात अनेक गंभीर आरोप केले आहेत.
या पत्रात नंतर आता राजकीय वातावरण तापलं असून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी केली आहे. काय म्हटलंय केशव उपाध्ये यांनी परमबीर सारख्या आयपीएस अधिकाऱ्याने आज जे आरोप केले की, अनिल देशमुख यांनी वझेवर खंडणी जमा करण्याची जबाबदारी टाकली होती. हे अत्यंत गंभीर आहेत. अत्यंत धक्कादायक आहे. हे राज्य जनतेचं असतं. हे राज्य खंडणीखोराचं आहे का? हे राज्य गुन्हेगारांचं आहे का? अशा प्रकारचा प्रश्न पडावा. असा संतापजनक प्रकार या पत्राद्वारे उपस्थित झाला आहे. त्यामुळे स्वत: गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा द्यायला हवा अन्यथा अनिल देखमुखांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.