Home > News Update > काशी, अयोध्या, मथुरेत भाजपचा दारुण पराभव

काशी, अयोध्या, मथुरेत भाजपचा दारुण पराभव

उत्तर प्रदेश मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आठ महिन्यांपूर्वी झालेली ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे 2022 च सेमीफायनल समजलं जात होतं. त्याच निवडणूकीत भाजपचा दारुन पराभव

काशी, अयोध्या, मथुरेत भाजपचा दारुण पराभव
X

मुंबई: पश्चिम बंगाल मध्ये अपयश आलेल्या भाजपला उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा मोठा झटका बसला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अयोध्या ते मथुरा आणि काशीपर्यंत समाजवादी पार्टीने संपूर्ण राज्यात भाजपला पराभूत केले आहे.

अयोध्येत एकूण 40 ग्रामपंचायतसाठी निवडणूक झाली होती. त्यातील 24 ठिकाणी समाजवादी पार्टीचा विजय झाला आहे. तर भाजपला फक्त 6 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर उरलेल्या जागेवर अपक्ष निवडून आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात सुद्धा भाजपला यश मिळवता आलं नाही. एकूण 40 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला अवघ्या 8 जगावर विजय मिळाला आहे. तर समाजवादी पार्टीच्या पारड्यात 14 जागा पडल्या आहेत. तर मायावतींच्या बसपाला 5 ठिकाणी विजय मिळाला आहे.

भगवान श्रीकृष्णाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मथुरा जिल्ह्याची चर्चा केली तर भाजपला येथेही पराभवाला सामोरे जावे लागलं आहे. भाजपला 8, बसपाला 12 , आरएलडी 9 जागा तर समाजवादी पार्टीला फक्त 1 ठिकाणी विजय मिळाला आहे. तर इतर ठिकाणी आपक्ष उमेदवार निवडून आले आहे.

भाजपच्या स्थापनेपासून अयोध्या, वाराणसी आणि काशी त्यांच्या अजेंड्यावर आहे. भाजप या जिल्ह्याच्या नावावर फक्त उत्तर प्रदेशात नव्हे तर देशभरात राजकारण करतं. अशात या तिन्ही ठिकाणी मिळालेला पराभव भाजपसाठी धक्कादायक समजला जात आहे.

उत्तर प्रदेश मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आठ महिन्यांपूर्वी झालेली ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे 2022 च सेमीफायनल समजलं जात होतं. सत्ताधारी भाजपसोबतच समाजवादी पार्टी बसपा आणि इतर पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. निवडणुकीच्या निकालानंतर समाजवादी पार्टीची ताकद पुन्हा एकदा पाहायला मिळाली तर, योगी सरकार साठी हा निकाल झोप उडवणारा ठरला आहे.

Updated : 4 May 2021 7:46 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top