Home > News Update > भाजपकडून विधान परिषदेच्या पाच जागांसाठी उमेदवारांची घोषणा ; तीन आयारामांना संधी
भाजपकडून विधान परिषदेच्या पाच जागांसाठी उमेदवारांची घोषणा ; तीन आयारामांना संधी
टीम मॅक्स महाराष्ट्र | 20 Nov 2021 10:05 AM IST
X
X
मुंबई : भाजपने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने कोल्हापूर, नागपूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि मुंबई अशा पाचही जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मात्र , उमेदवारांचा विचार केला तर भाजपने आयारामांना संधी दिल्याचे दिसत आहे, कारण, पाचपैकी तीन उमेदवार हे काँग्रेसमधून आलेले आहेत. धुळे-नंदुरबार मतदारसंघातून उमेदवार अमरिश पटेल , मुंबईतून संधी मिळालेले उमेदवार राजहंस सिंग आणि कोल्हापूर मतदारसंघातून तिकीट मिळालेले अमल महाडिक हे तिघेही मूळ काँग्रेसचे नेते आहेत.
दरम्यान भाजपने मुंबईतून राजहंस सिंह , कोल्हापूरातून अमल महाडिक,धुळे-नंदुरबारातून अमरीश पटेल, नागपूरातून चंद्रशेखर बावनकुळे,अकोला-बुलडाणा-वाशिम मतदार संघातून वसंत खंडेलवाल यांना संधी देण्यात आली आहे.
Updated : 20 Nov 2021 12:17 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire