बिरसा मुंडांवर भाजपकडून आक्रमण, राहुल गांधी यांचा घणाघात
X
भाजप आणि आरएसएस बिरसा मुंडा यांच्या विचारांवर अतिक्रमण करत असल्याची घणाघाती टीका राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत केली. या देशात आदिवासी हे मुळनिवासी आहेत. त्याबरोबरच बिरसा मुंडा हे आदिवासींच्या हक्कांसाठी लढले. मात्र आदिवासींचा उल्लेख वनवासी असा करून भाजप आणि आरएसएस बिरसा मुंडा यांच्यावर अतिक्रमण करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात केली.
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, मी माझ्या भाषणाची सुरुवात मेरे आदिवासी भाई और बहनों अशी केली. मात्र आदिवासी हे देशाचे मालक असूनसुध्दा त्यांच्या जमीनीवर आक्रमण केले जात आहे. या संपुर्ण देशात सर्वात आधी आदिवासी आले होते. त्यामुळे या देशावर पहिला हक्क आदिवासींचा आहे. मात्र आदिवासी विमानातून फिरु शकत नाही, फक्त जंगलात राहु शकतात अशी परिस्थिती भाजपकडून निर्माण केली जात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
3 हजार वर्षापुर्वी देशभर जंगल होते. 50 वर्षापुर्वी जंगलाचे प्रमाण मोठे होते. मात्र आता खूपच कमी जंगल शिल्लक राहिले आहे. त्यामुळे आदिवासींचा उल्लेख वनवासी असा केला जात असल्याने भविष्यकाळात वनवासींना काही अर्थ उरणार नसल्याचे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
आदिवासींना हक्क देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहीले आणि काँग्रेस पक्षाच्या सरकारने त्यास मान्यता दिली. मात्र आदिवासींना देण्यात येणारे हक्क भाजपला मान्य नव्हते, असं राहुल गांधी म्हणाले.
देशात सरकारी शाळा बंद केल्या तर आदिवासी बालकं अशिक्षीत राहतील. सार्वजनिक सेवा बंद केल्या तर त्याचा फटका आदिवासींना बसणार आहे, अशी टीका राहुल गांधी म्हणाले.
मला तुमचं धन नको, जमीन नको, मला माझ्या लोकांना हक्क द्यायचे आहेत, असं बिरसा मुंडा म्हणायचे. मात्र दुसरीकडे सावरकर दोन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहीले तर त्यांनी इंग्रजांना पेन्शनसाठी चिठ्ठ्या लिहीयला सुरुवात केल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी पुढे म्हणाले, तुम्ही वनवासी नाही तर आदिवासी आहात.