Home > News Update > भाजप नेत्यांना अर्णवचा पुळका का?: अरुण पां. खटावकर, लालबाग

भाजप नेत्यांना अर्णवचा पुळका का?: अरुण पां. खटावकर, लालबाग

रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर भाजप व त्यांच्या समर्थनार्थ उतरली आहे.भाजप नेत्यांना अर्णवचा पुळका का? असं अरुण पां. खटावकर यांनी म्हटले आहे...

भाजप नेत्यांना अर्णवचा पुळका का?: अरुण पां. खटावकर, लालबाग
X

रिपब्लिक टीव्हीचा सर्वेसर्वा अर्णव गोस्वामीला अन्वय नाईकला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अलिबाग येथून अटक केली.या अटकेवर भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.वास्तविक अर्णव गोस्वामी हा भाजपच्या आश्रयाने मोठा झाला.भाजपच्या सत्तेत विरोधकांना एकेरी भाषेत ओरडून बोलणे ,टीका करणे ही कामे तो करीत होता.याचा अनुभव महाराष्ट्रातील जनतेला आलेला आहेच.आता टीआरपी घोटाळ्यातही तो सापडण्याची शक्यता अधिक आहे.

याचाच अर्थ भाजपच्या काळात तो मस्तीत वागत होता.आता हे नाईक प्रकरण गंभीर असंल्याशिवाय आणि अर्णवच्या विरोधात पुरावे मिळाल्याशिवाय पोलीस कारवाई करणार नाहीत.आता जे काही होईल ते कोर्टात पण या आधीच भाजप नेत्यांना अर्णवचा पुळका का येतो हे जनतेला कळले असेल.एकट्या अर्णवला अटक झाल्यावर आणीबाणीचा आरोप करणे योग्य आहे काय ?सत्ता गेल्याने सैरभैर झालेल्या भाजपने कंगना आणि अर्णव सारख्या लोकांना पाठींबा देऊन महाविकास आघाडी विरुद्ध मोर्चे उघडले होते पण आता दोघांच्याही डोक्यावर अटकेची टांगती तलवार असल्यामूळे भाजपला वाईट वाटणे शक्य आहे.

Updated : 4 Nov 2020 2:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top