Home > News Update > विधान परिषदेसाठी भाजपची चार नावांची यादी जाहीर

विधान परिषदेसाठी भाजपची चार नावांची यादी जाहीर

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा तिढा अद्याप सुटला नसताना विधान परिषदेची निवडणूक लागली आहे. महा विकास आघाडीत विधान परिषदेचे एकमत होत नसताना भाजपने आघाडी घेत चार नावं जाहीर केली आहेत.

विधान परिषदेसाठी भाजपची चार नावांची यादी जाहीर
X

१ डिसेंबर २०२० रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघातहोणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीनेआज भाजपा उमेदवारांची नावे घोषित केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

5 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरवात होणार असून उमेदवारी दाखल करण्याची मुदत 12 नोव्हेंबर आहे 13 नोव्हेंबर रोजी छाननी होईल. 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे आवश्यकता भासल्यास एक डिसेंबर रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होईल. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विधान परिषदेची निवडणूक एकत्रितरित्या महाविकास आघाडी लढणार की स्वतंत्र आपापल्या उमेदवार लढणार हे अद्याप निश्‍चित धोरण नसताना भाजपने उमेदवारांची नावे जाहीर करून आघाडी घेतली आहे.

उमेदवारांची नावे अशी आहेत -

१) औरंगाबाद (पदवीधर) - शिरीष बोराळकर

२) पुणे (पदवीधर) - संग्राम देशमुख

३) नागपूर (पदवीधर) -संदीप जोशी

४) अमरावती (शिक्षक मतदार संघ) - नितीन धांडे

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले.

Updated : 9 Nov 2020 7:27 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top