`बर्ड फ्लू'मुळे ३०० कोंबड्यांचा मृत्यू, २३ हजार कोंबड्या केल्या नष्ट, शहापुरमधील घटना
X
ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यातील वेहळोली गावातील मुक्तजीवन सोसायटीच्या फार्ममधील ३०० हुन अधिक देशी कोंबड्या आणि बदके गेल्या काही दिवसांत मृत पावली आहेत.या कोंबड्या आणि बदकांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं तपासनी अहवालात निष्पन्न झाली आहेत.यामुळे प्रशासन सर्तक झालं असुन क्षेत्राच्या एक किलोमीटर परिसरातील २३ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत.तसेच क्षेत्राच्या १० किलोमीटर परिसरातील कोंबड्यांचे नमुने तपासण्यची मोहीम सुरु करण्यात आली आहे.
बाधितक्षेत्र संसर्गमुक्त होईपर्यंत क्षेत्राच्या एक किलोमीटर परिसरातील चिकन विक्रेते आणि वाहतूकदारांचे दैनंदिन कामकाज रोखण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.दरम्यान पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी माहिती दिली आहे.शहापुरमधील बर्ड फ्लूची परिस्थिती सध्या आटोक्यात आहे.प्रशासन याबाबत खबरदारी घेत असुन चिंता करण्याचं काही कारण नाही.असं ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, गुरवारी ३०० पक्षी मृत्यूमुखी पडले. आमची पशुसंवर्धन विभागाची टिम घटनास्थळी दाखल आहे. तो परिसर सील करण्यात आला आहे.नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले असुन संध्याकाळपर्यंत माहिती मिळेल. दक्षता म्हणून याचा फैलाव होऊ नये यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. हे वाढणार नाही असा शब्द देतो, तसंच नुकसान झालेल्यांना नियमाप्रमाणे मदत दिली जाईल.
बर्डफ्लू अचानक का आला याची माहिती घेत असून त्याला कायमस्वरुपी थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.ग्रामीण अर्थव्यवस्थेला पाठबळ देणारा हा उद्योग आहे. अनेक तरुणदेखील यात सहभागी असल्याने राज्य सरकारचीही ते सुरळीत चालेल याची जबाबदारी आहे, असं सुनील केदार म्हणाले.