धक्कादायक : नागपुरात बर्ड फ्लूने 3 वाघ, एका बिबट्याचा मृत्यू
X
नागपुरात बर्ड फ्लूमुळे तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचा धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये ३ वाघ व एका बिबट्याचा २० ते २३ डिसेंबरदरम्यान मृत्यू
एच-५एन-१ विषाणूमुळे झाल्याचा अहवाल भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थानने दिला आहे.
व्याघ्र प्रकल्प आणि बचाव केंद्रांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बर्ड फ्लूमुळे वाघाचा मृत्यू होण्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याची माहिती गोरेवाडा रेस्क्यू सेंटरचे संचालक शतानिक भागवत यांनी दिली. उलट्या, डोळ्यात पाणी येणे, छातीत इन्फेक्शन व ताप अशी लक्षणे वाघ आणि बिबट्यत दिसली.
१२ वाघ, २६ बिबटे निरोगी
वाघ डिसेंबर २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात चंद्रपुरातील टीटीसीतून तर बिबट बुलाडण्यातून मे २०२४ मध्ये आला होता. डिसेंबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात वाघ आणि बिबट्याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मृत तीनही वाघ तीन ते चार वर्षांचे होते, तर बिबट्या ७ ते ८ महिन्यांचा होता. रेस्क्यू सेंटरमधील २६ बिबटे आणि १२ वाघ तपासणीत निरोगी आढळले.