Home > News Update > बर्ड फ्ल्यूबाबत अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार: सुनील केदार

बर्ड फ्ल्यूबाबत अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार: सुनील केदार

महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याने राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी चिकन, अंडी खाणार असाल तर ७० डिग्री सेल्सिअस तापमानावर अर्धा तास चिकन, अंडी शिजवा आणि मगच खा, असा सल्ला राज्यातील जनतेला दिला आहे. यासोबतच त्यांनी बर्ड फ्ल्यूबाबत अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

बर्ड फ्ल्यूबाबत अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार: सुनील केदार
X

राज्यात फक्त परभणीत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचं आढळून आलं आहे. राज्यात इतरत्रं बर्ड फ्ल्यू झाल्याचं अद्याप निदान झालेलं नाही. त्यामुळे चिकन, अंडी खाऊ शकता. येऊ पाहत असलेला बर्ड फ्ल्यू हा तेव्‍हासारखा भयावह असल्याचे सध्यातरी दिसत नाहीये. त्यामुळे राज्यातील जनतेने विशिष्ट तापमानावर शिजवलेले चिकन आणि अंडी खाण्यास काहीही हरकत नाही, असे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले.

असे असले तरीही परभणीतून घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल आला असून तो पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे. याबाबत मंत्री केदार म्हणाले, अंडी किंवा कोंबड्यांना विशिष्ट तापमानावर अर्धा तास शिजविले, तर त्यामधील जिवाणू मरतात. या महाराष्ट्राने अशा प्रकारचा कहर २००६ मध्ये पाहिला आहे. त्यावेळी राज्य शासनाने केंद्र शासनाची वाट न पाहता पोल्ट्री व्यावसायिकांना मदतीचा हात दिला होता. यंदाही राज्य शासनाची तीच भूमिका राहील, असेही केदार म्हणाले. मोठे पिट्स खोदतो. त्यामध्ये औषधे टाकून कोंबड्या टाकतो. तेच आपण यावेळीही करणार आहोत. मात्र, पोल्ट्री धारकांनी आम्हाला याबाबत माहिती द्यावी.

२००६ मध्ये आलेला बर्ड फ्ल्यू आणि यंदाचा बर्ड फ्लूमध्ये फरक आहे. यंदा कोरोनाचेही संकट आहे. त्यामुळे सर्वांनी शासनाला माहिती द्यावी, असेही पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले.

Updated : 12 Jan 2021 3:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top