बिल्किस बानोला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, एक याचिका फेटाळली...
X
गुजरात दंगलीमधील 11 दोषींच्या सुटकेच्या विरोधात पीडित बिल्कीस बानोने दाखल केलेल्या याचिकेतील एक याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आक्षेप घेणाऱ्या दोन याचिकांपैकी एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
गुजरातमध्ये 2002 मध्ये बिल्कीस बानोवर बलात्कार करण्यात आला होता. तसंच तिच्या कुटुंबातील अनेक व्यक्तींची हत्या करण्यात आली होती. या 11 दोषींची सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारच्या शिफारसी नुसार सुटका केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने या दोषींना सोडण्यापुर्वी मे 2022 ला गुजरात सरकारला पुन्हा एकदा या दोषींच्या शिफारसींचा विचार करण्यात यावा. असा आदेश दिला होता... मे गुजरात सरकारच्या उत्तरानंतर सर्वोच्च न्यायालयाने या दोषींची चांगल्या व्यवहाराच्या धर्तीवर 15 ऑगस्टला सुटका केली आली होती.
बिल्कीस बानोने मे 2022 ला सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दिलेल्या आदेशाच्या आधारावर याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मात्र, ज्या आधारावर या आरोपींची सुटका करण्यात आली होती. त्याविरोधात बिल्कीस बानोने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे.