''रामचरितमानस द्वेष पसरवणारा ग्रंथ'' बिहारच्या शिक्षण मंत्र्यांचे वक्तव्य
X
बिहारचे शिक्षण मंत्री डॉ. चंद्रशेखर (dr chandrashekhar) यांनी मनुस्मृती (manusmriti) आणि रामचरितमानस (ramcharitmanas) या पुस्तकांचे वर्णन समाजात द्वेष पसरवणारे पुस्तक असे केले आहे. ते म्हणाले- रामचरित मानस दलित-मागास आणि महिलांना समाजात शिक्षण घेण्यापासून रोखतो. त्यांना त्यांचे हक्क मिळण्यापासून प्रतिबंधित करते. पाटणा येथील ज्ञान भवन येथे काल नालंदा मुक्त विद्यापीठाच्या (Nalanda Open University) 15 व्या दीक्षांत समारंभात शिक्षण मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, भारत द्वेषाने नव्हे तर प्रेमाने मजबूत आणि समृद्ध होईल. देशात सहा हजारांहून अधिक जाती आहेत. जितक्या जाती आहेत तितक्याच द्वेषाच्या भिंती आहेत. जो जोपर्यंत समाजात या भिंती आहेत तोपर्यंत भारत जगात महान होऊ शकत नाही.
डॉ.चंद्रशेखर म्हणाले की, संघ आणि नागपूरशी संबंधित लोक समाजात द्वेष पसरवतात. 'रामचरितमानस अधम जाति में विद्या पाये, भयहू यथा अही दूध पाये…' या दोह्याचे वाचन करताना म्हणाले की, समाजात द्वेष पसरवणारे हे पुस्तक आहे. अधम म्हणजे नीच, खालच्या जातीतील लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, खालच्या जातीतील लोकांना शिक्षण मिळाले तर ते सापासारखे विषारी बनतात. या ग्रंथातून दलित-मागास आणि समाजातील महिलांना अभ्यास करण्यापासून रोखले जाते. त्यांना त्यांचे हक्क मिळण्यापासून रोखले गेले असं देखील डॉ. चंद्रशेखर म्हणाले..
माध्यमांसमोरही विधानावर ठाम..
कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांसमोरही शिक्षणमंत्री आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले. ते म्हणाले की, एकेकाळी मनुस्मृतीने समाजात द्वेषाचे बीज पेरले. त्यानंतर रामचरितमानसने समाजात द्वेष निर्माण केला. आजच्या काळात गोळवलकरांचा विचार समाजात द्वेष पसरवत आहे. ते पुढे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली कारण या ग्रंथाने दलित आणि वंचितांचे हक्क हिरावून घेतात. रामचरितमानसात असे अनेक श्लोक आहेत, जे समाजात द्वेष निर्माण करतात.