Home > News Update > Bihar Election: पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात...

Bihar Election: पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात...

Bihar Election: पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात...
X

बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात होत आहे. एकूण 243 मतदार संघ असलेल्या बिहार विधानसभेसाठी आज 28 (ऑक्टोबर) पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यामध्ये 71 जागांसाठी मतदान पार पडत आहे. साधारण पणे 7 कोटी 30 लाख मतदार निवडणुकीत आपला हक्क बजावणार आहेत. भाजप, कॉंग्रेस, चिराग पासवान यांचा लोकजन शक्तीपक्ष, नितीश कुमार यांचा जनता दल (युनाटेड), तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल हे पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत.

मात्र, खरी लढाई तेजस्वी यादव vs नितीश कुमार असल्याची पाहायला मिळत आहे. कोरोना काळात होणारी ही देशातील पहिलीच निवडणूक असल्याने मतदार नक्की कोणाच्या पारड्यात आपलं मतदान टाकतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. पहिल्या टप्प्यात कोणत्या पक्षाचे किती उमेदवार मैदानात...

जनता दल: ३५

भाजप: २९

राष्ट्रीय जनता दल: ४२

कॉंग्रेस: २०

लोकजनशक्ती पार्टी: 41

किती टप्प्यात मतदान...


निवडणूक तीन टप्प्यात पार पडत आहे.

पहिला टप्पा: 28 ऑक्टोबर

दुसरा टप्पा: 03 नोव्हेबर

तिसरा टप्पा: 7 नोव्हेबर

10 नोव्हेबरला निकाल...

Updated : 3 Nov 2020 8:59 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top