गुजरातमधी मुंद्रा बंदरात 9 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त, जगातील सगळ्यात मोठी तस्करी उघड
XPhoto courtesy : social media
डीआरआयच्या टीमने आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुजरातमधील मुंद्रा बंदरातून 9000 कोटी रुपयांचं ड्रग्स जप्त केली आहेत. अधिकाऱ्यांनी मारलेल्या छाप्यात येथून 2,988.22 किलो हेरॉईन जप्त केलं आहे. ड्रग्सच्या या साठ्याचं आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे.
वास्तविक, जप्त केलेला माल विजयवाडाच्या आशी ट्रेडिंग कंपनीच्या आयात केलेल्या मालाच्या पॅकेजमध्ये लपवण्यात आला होता. ही कंपनी अफगाणिस्तानातून माल आयात करून इराणमधील अब्बास बंदरातून गुजरातमधील मुंद्रा बंदरात पाठवण्याचा दावा करते.
कंधारमधील हसन हुसेन लिमिटेडमधून आयात केलेल्या 'टॅल्कम पावडर'च्या नावाने विजयवाडास्थित कंपनीवर हेरॉईनची तस्करी केल्याचा आरोप आहे. आज या कंपनीला रंगेहाथ पकडण्यात आले. डीआरआयने जप्त केलेल्या ड्रग्स ची सर्वात मोठी खेप असल्याचे बोललं जात आहे. ज्याची किंमत 9,000 कोटी रुपये आहे.
या संदर्भात 4 लोकांना ताब्यात घेतलं असून पोलिस पुढील तपास करत आहेत.