...आता बिग बींनाही दुसरा जॉब शोधायची गरज नाही!
X
चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटिटि उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सरकारने 65 वर्षाच्या वर असणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना शूटिंगसाठी नो एंट्री असल्याने सरकारच्या निर्णयावर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी नाराजी व्यक्त केली होती. राजकारणातील ६० वर्षापुढील नेत्यांनी राजीनामे द्यावे. त्यांनी आधी निवृत्त व्हावे अशी संतप्त भूमिका विक्रम गोखले यांनी घेतली होती. तसंच ६५ वर्षापुढील कलाकार आपली काळजी घेऊन काम करतील. त्यामुळे त्यांना सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती.
कोविड-19 पार्श्वभूमीवर बंद असलेली चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / ओटिटि यांच्या चित्रिकरणाची कामे, नियंत्रित स्वरुपात पुन्हा सुरु करण्याकरीता; मार्गदर्शक सूचना, शासन निर्णय दिनांक 30 मे 2020 व दिनांक 23 जून 2020 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. या सूचनांमध्ये, 65 वर्षावरील कोणत्याही कलाकार / क्रू सदस्यांना चित्रीकरण स्थळावर परवानगी दिली जाणार नाही, अशी अट ठेवण्यात आली होती. आता ही अट शिथील केली आहे.
बीग बींना नवीन जॉब शोधावा लागणार नाही...
माझ्या सारख्यांसाठी हे पॅकअप सारखे आहे. पण आता कोर्टाने ६५ वर्षांवरील कलाकारांना शूटिंगसाठी परवानगी दिली खरी, पण ते स्वातंत्र्य अनुभवता येत नाही. मनात कायम भीती घर करून राहते. माझ्यासाठी दुसरा कुठला जॉब असेल तर मला सांगा.
असं बच्चन यांनी म्हटलं होतं. आता बच्चन यांना नवीन जॉब शोधावा लागेल.