BHR पतसंस्था घोटाळा: माजी मंत्र्यांच्या निकटवर्तीयांसह १२ जणांना अटक
X
जळगावमधील BHR म्हणजेच भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेमधील कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राज्यभरातून 12 जणांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
या अटक सत्रात जळगाव भाजप आमदार सुरेश भोळे यांचे शालक तसेच शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांचे काका व्यावसायिक भागवत भंगाळे यांचाही समावेश आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच अटक सत्रात भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या दोन निकटवर्तीयांना जामनेर येथून अटक केली आहे.
गेल्या वर्षी BHR घोटाळ्याप्रकरणी अनेक जणांना अटक करण्यात आली होती. महाजन यांचे निकटवर्तीय व्यावसायिक सुनील झंवर यांनाही अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील काही जणांचा जामीन होत असतांना पुण्याच्या टीमने गुरूवारी सकाळी अटक सत्र राबवल्याने खळबळ उडाली आहे. भागवत भंगाळे यांना अटक झाल्यानंतर जळगावचे आमदार सुरेश भोळे यांनी जिल्हा पोलिस ठाण्यात हजेरी लावली. यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्काला उधाण आले होते.भंगाळे यांच्या घराची झडती पोलीस घेत आहे.
जळगाव, पुणे, नाशिक ,औरंगाबाद, अकोला, मुंबई आणि धुळे येथील 12 जणांना पुण्याच्या टीम ने ताब्यात घेतले आहे.
यात भागवत भंगाळे ( जळगाव)
असिफ मुन्ना तेली (भुसावळ),
जितेंद्र पाटील ,
छगन झालटे (जामनेर)
शांतीलाल लोढा ,
प्रितेश जैन ( धुळे)
अंबादास मानकापे ( औरंगाबाद)
जयश्री अंतिम तोतला (मुंबई)
प्रेम कोगटा (पुणे)
प्रमोद कापसे ( अकोला)
BHR घोटाळ्या प्ररकणी अनेक राजकीय बडे नेते गडावर आहेत का, पोलीस त्यांच्यापर्यंत खरंच पोहचतील का, हा खरा प्रश्न आहे.