Home > News Update > भीमा कोरेगाव प्रकरणी आणखी एक 'थेअरी' उघड

भीमा कोरेगाव प्रकरणी आणखी एक 'थेअरी' उघड

भीमा कोरेगाव प्रकरणी आरोपी असलेल्या फादर स्टेन स्वामी यांच्या मृत्यूनंतर आता पुन्हा एकदा नवा खुलासा झाला आहे. रोना विल्सन यांच्यानंतर आरोपी'सुरेंद्र गडलिंग यांच्या संगणकासोबतही सोबत छेडछाड करून पुरावेही प्लांट' केले असा धक्कादायक अहवाल Arsenal कंपनीने दिला आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणी आणखी एक थेअरी उघड
X

भीमा-कोरेगाव प्रकरणात (Bhima Koregaon Case) अमेरिकेतील डिजिटल फॉरेन्सिक फर्म आर्सेनल कन्सल्टिंगने (Arsenal Consulting) आता आणखी एक मोठा दावा केला आहे. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये आपला पहिला आणि दुसरा अहवाल प्रसिद्ध करणार्‍या कंपनीने आता तिसरा अहवाल जारी केला आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मानवाधिकार कार्यकर्ता सुरेंद्र गडलिंग यांच्या कम्प्युटरसोबत छेडछाड केली गेल्याचं आणि पुरावे प्लांट करण्यात आल्याची धक्कादायक माहिती अहवाल देण्यात आली आहे. आर्सेनल कन्सल्टिंगच्या अहवालानुसार, 2018 साली सुरेंद्र गडलिंग यांच्या अटकेच्या दोन वर्षापूर्वी ई-मेलद्वारे त्यांच्या कम्प्युटरसोबत छेडछाड करण्यात आली होती.

या ई-मेलचा रिसीव्हर फक्त सुरेंद्र गडलिंग यांना नव्हे तर स्टॅन स्वामी यांच्यासारखे इतर कार्यकर्तांना देखील पाठविण्यात आले होते. अशावेळी अशीही भीती व्यक्त केली जात आहे की, स्टॅन स्वामी आणि इतर लोकांच्या कम्प्युटरमध्ये छेडछाड करण्यात आली असावी.

पुण्यात भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेले मानव अधिकार कार्यकर्ते अॅड. सुरेंद्र गडलिंग यांचा संगणक हॅक करून त्यांना आरोपी ठरवण्यासाठी काही गुन्हेगारी प्रकारचे मेल टाकण्यात आले होते. रोना विल्सन यांच्या संगणकात असेच पुरावे टाकणाऱ्या हॅकरनेच हा प्रकार केला होता. अमेरिकेतील एका आघाडीच्या दैनिकाने हा दावा केला होता.

Updated : 7 July 2021 7:50 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top