Home > News Update > Bhima Koregaon : वरावरा राव यांना तीन महीन्यासाठी जामीन : कायम जामीनास कोर्टाचा नकार

Bhima Koregaon : वरावरा राव यांना तीन महीन्यासाठी जामीन : कायम जामीनास कोर्टाचा नकार

Bhima Koregaon : वरावरा राव यांना तीन महीन्यासाठी जामीन : कायम जामीनास कोर्टाचा नकार
X

भिमा कोरेगाव प्रकरणातील (Bhima Koregaon Case) आरोपी तेलगु कवी वरावरा राव (varavara rao)यांना तीन महीन्याचा वैद्यकीय जामीन मंजूर झाला असून कायमस्वरुपी जामीन देण्याची मागणी खंडपीठाने फेटाळून लावली आहे.

वरा राव यांना यापूर्वीच्या खंडपीठाने फेब्रुवारी 2021मध्ये सहा महिन्यांसाठी तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर केला होता. सहा महिन्यांची मुदत संपणार असताना, राव यांनी फेब्रुवारी 2022मध्ये वैद्यकीय जामीन वाढवण्यासाठी आणि जामिनाच्या अटींमध्ये बदल करण्यासाठी अर्ज केला. तथापि राष्ट्रीय तपास संस्थेच्या एनआयए आक्षेपानुसार उच्च न्यायालयाने वरावरा राव यांना नव्या कारणांसह याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

आरोग्याच्या कारणास्तव वरावरा राव हे गेली 149 दिवस रुग्णालयात आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती कशी आहे याबाबत माहिती मिळते. असा युक्तीवाद वरावरा राव यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेत बाजू मांडताना वकिलांनी केला. या वेळी वरावरा राव यांच्या प्रकृतीबाबत स्पष्ट माहिती असताना, त्यांची वैद्यकीय स्थिती माहिती असतानाही त्यांना अटकेत ठेवणे हे त्यांच्या जीवनासाठी आणि जगण्याच्या, चांगल्या आरोग्यच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. आसाही दावा त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला होता.

या पार्श्वभूमीवर राव यांनी अधिवक्ता आर सत्यनारायणन यांच्यामार्फत तीन स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. वरावरा राव यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या तिन्ही अर्जाला राष्ट्रीय तपास यंत्रणेने विरोध दर्शवला. वरावरा राव यांना कुठलाही अंतरिम दिलासा तसाच जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद ASG अनिल सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला होता.

अनेक वैद्यकीय आजारांसह मुंबईत राहणे महाग झाले होते. वरावरा राव दरमहा सुमारे 96,000 खर्च करत आहे. तर त्यांना तेलंगणा राज्यातून मिळणारे पेन्शन फक्त 50,000 आहे. तेलंगणात राहण्याचा खर्च आणि वैद्यकीय खर्च कमी आहे, हे लक्षात घेऊन हैदराबादमध्ये राहून तो पैसा वाचवू शकतात.तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया, पार्किन्सन्स आणि नाभीसंबधीचा हर्निया यासारख्या वैद्यकीय आजारादरम्यान सतत वैद्यकीय काळजी घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर, त्यांची पूर्णवेळ काळजी घेणे आवश्यक आहे. वरावरा राव यांच्यावर यापूर्वी लावण्यात आलेल्या सर्व गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मात्र, सध्याच्या खटल्यात त्यांची प्रकृती खालावलेली असतानाही त्यांना मागील वेळेप्रमाणे आणखी खराब होऊ नये, म्हणून तुरुंगात ठेवता आले नाही.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात (Bhima Koregaon Case) पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरी नक्षलवाद आरोपप्रकरणी त्यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) खटला सुरु आहे. ते 82 वर्षांचे आहेत. प्रकृतीच्या कारणावरुन वरावरा राव यांनी न्यायालयाकडे जामीन अर्ज दाखल केला होता. अनेकदा हा अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. अखेर न्यायालयाने राव यांना आज जामीन मंजूर केला आहे. कोर्टाना आजा मोतीबिंदू शस्त्रक्रीयेसाठी तीन महीन्याचा वैद्यकीय जामीन मंजूर करत कायमस्वरुपी जामीन मंजूर करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.

Updated : 13 April 2022 1:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top