Home > News Update > अर्णबच्या रिपब्लिक टीव्हीच्या ऑफिसबाहेर घोषणाबाजी

अर्णबच्या रिपब्लिक टीव्हीच्या ऑफिसबाहेर घोषणाबाजी

अर्णबच्या रिपब्लिक टीव्हीच्या ऑफिसबाहेर घोषणाबाजी
X

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अडचणीत आलेल्या अर्णब गोस्वामीचे मुख्य आरोपी पार्थो दासगुप्तासोबतचे चॅट उघड झाल्यानंतर अर्णबच्या अडचणी वाढल्या आहेत. अर्णबचे व्हॉट्सअप चॅट जगजाहीर झाल्यानंतर अर्णबला बालाकोट इथल्या कारवाईसंदर्भात आधीच माहिती होती हे उघड झाले आहे.

यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याने अर्णबवर देशद्रोहाचा आऱोप होतोय. याचसंदर्भात काही तरुणांनी बुधवारी अर्णबच्या रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या हातात समाजवादी पार्टीचे तसेच भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांचे पोस्टर्स होते.




Updated : 20 Jan 2021 5:06 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top