Home > News Update > बीडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी केले भिकमांगो आंदोलन...!

बीडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी केले भिकमांगो आंदोलन...!

बीडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी केले भिकमांगो आंदोलन...!
X

पाटोदा शहरात केळीच्या गाड्या वर ,जनरल स्टोअर्सवर, हॉटेलवर, पान टपरीवर ,कापड दुकानावर ,झोळी घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी भीक मागितले आहे. गळ्यात मागण्यांचे फलक लावून सरकारचा केला निषेध केला आहे.

एस टी चे राज्यशासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे मागि‌ल महिन्याच्या काळात 75 एसटी कर्मचारी शहीद झाले आहे, त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली, आणि असे असतांना सरकार कडून अजूनही विलीनीकरण करण्याची मानसिकता दिसत नसल्याने , सरकार चा निषेध करत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पाटोदा आगारातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी पाटोदा शहरात भीक मांगो आंदोलन केले, कर्मचाऱ्यांनी हातात झोळी, आणि गळ्यात विविध मागण्यांचे पोस्टर लावून, पाटोदा शहरातील शिवाजी चौकात भीक मागण्यात आली जोपर्यंत शासनात एसटीचे विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशाराही यावेळी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे...

Updated : 26 Jan 2022 6:06 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top