Bharat Ratna Award : अडवाणींपाठोपाठ चौधरी चरणसिंह, नरसिंह राव आणि स्वामीनाथन यांना भारतरत्न
X
Bharat Ratna Award : भारत सरकारने एकाच वेळी तीन दिग्गजांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. चौधरी चरण सिंह, नरसिंह राव आणि एमएस स्वामीनाथन (मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार) यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ''देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे, हे आपल्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे अशा पद्धतीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सपोस्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकापाठोपाठ एक असे तीन एक्स पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली.
मागील आठवड्यात भारत सरकारने माजी उपपंतप्रधान लाल कृष्ण आडवणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यानंतर एकाच आठवड्यात चार दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार देऊन भारत सरकारकडून सन्मानित करण्यात आलेय.
चौधरी चरण सिंह यांच्याबद्दल काय म्हणाले पंतप्रधान ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ''देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे, हे आपल्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. त्यांचे आमच्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे." अशा पद्धतीचं एक्स पोस्ट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.
हमारी सरकार का यह सौभाग्य है कि देश के पूर्व प्रधानमंत्री चौधरी चरण सिंह जी को भारत रत्न से सम्मानित किया जा रहा है। यह सम्मान देश के लिए उनके अतुलनीय योगदान को समर्पित है। उन्होंने किसानों के अधिकार और उनके कल्याण के लिए अपना पूरा जीवन समर्पित कर दिया था। उत्तर प्रदेश के… pic.twitter.com/gB5LhaRkIv
— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2024