Home > News Update > "भारत जोडो न्याय यात्रा" आज दुसरा दिवस, धुळे आणि मालेगावात होणार दाखल

"भारत जोडो न्याय यात्रा" आज दुसरा दिवस, धुळे आणि मालेगावात होणार दाखल

भारत जोडो न्याय यात्रा आज दुसरा दिवस, धुळे आणि मालेगावात होणार दाखल
X

राहूल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज महाराष्ट्रात दुसरा दिवस आहे. मंगळवारी ही यात्रा नंदूरबारमध्ये दाखल झाली, तर आज या यात्रेच्या धुळे आणि मालेगाव प्रवासाचा टप्पा होणार आहे. मालेगावात दुपारी ३ वाजता राहूल गांधीचा रोड शो होईल, तर गावातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा संपन्न होणार आहे. त्यानंतर राहूल गांधी हे मालेगावच्या जवळ असलेल्या सौंदाणे गावात जातील आणि त्याठिकाणी त्यांचा रात्रीचा मुक्काम असणार आहे.

१४ मार्च रोजी शरद पवार या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होऊन उपस्थित राहणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर शरद पवार आणि राहूल गांधी हे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

दरम्यान, लोकसभेच्या निवडणूकीच्या तारख लवकरच जाहीर होणार आहेत. अशातच राहूल गांधीची न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. त्यामूळे आगामी लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी आणि त्यातच राहूल गांधीच्या भारत जोडो न्याय यात्रेचा महाराष्ट्रात होणारा समारोप ही मोठी राजकीय घडामोड असल्याची चर्चा सध्या राज्यात सुरू आहेत.

Updated : 13 March 2024 11:54 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top