भंडारा अग्निकांड प्रकरणी २ नर्सेसवर गुन्हा
X
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आग प्रकरणी दोन नर्सेसवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या अग्निकांडात १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये ही आग लागली होती.
या आगीमुळे १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. ही आग कशी लागली आणि यात कुणाचा दोष आहे याचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या चौकशीत या घटनेला दोन्ही नर्स जबाबदार असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडली तेव्हा या ठिकाणी १७ बालके होती. त्यातील ७ बालकांना वाचवण्यात यश आले. पण १० मुलांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचे तपासात निष्पन्न झाले. पण या इमारतीचे फायर ऑडिट झाले नव्हते हेसुदधा तपासात समोर आले आहे. तसेच इथे कोणत्याही प्रकारची फायर ऑडिट यंत्रणा उपलब्ध नव्हती.