बंगाली डॉक्टर करतायेत कोरोना संशयितांवर उपचार
डॉक्टरची डिग्री सोडा साधं ग्रामपंचायत आणि जिल्हापरिषदची ना हरकत प्रमाणपत्र नसलेले हे डॉक्टर गाव-खेड्यात कोरोना संशयित रुग्णांवर बिनधास्तपणे उपचार करतायत.
X
राज्यात कोरोनाचे संकट उभा असताना दुसऱ्याकडे मराठवाड्यासह औरंगाबाद जिल्ह्यात कोणतेही पदवी नसतात उपचार करणारे अनेक बोगस डॉक्टर आपले दुकान मांडून बसले आहेत. डॉक्टरची डिग्री सोडा साधं ग्रामपंचायत आणि जिल्हापरिषदची ना हरकत प्रमाणपत्र नसलेले हे डॉक्टर गाव-खेड्यात कोरोना संशयित रुग्णांवर बिनधास्तपणे उपचार करतायत.
अशाच बोगस डॉक्टरांपैकी एक म्हणजे औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बालानगर गावातील डॉक्टर विश्वास एक आहे. विशेष म्हणजे लोकांना आपल्यावर विश्वास बसावा म्हणून, या बंगाली डॉक्टरने आपलं नाव सुद्धा विश्वास ठेवून घेतलं. ताप, सर्दी,खोकल्या असलेल्या कोरोना संशयित रूग्णांवर पॅरिसीटेमॉल सारख्या गोळ्या देऊन हे डॉक्टर बिनधास्तपणे उपचार करतोय.
औरंगाबाद जिल्ह्यात असे डॉक्टर विश्वास एक नाही,तर गावखेड्या पासून तांड्यापर्यंत असे बोगस डॉक्टर वर्षानुवर्ष ठाण मांडून बसले आहेत. ग्रामीण भागात जसा कोरोना वाढू लागला तसा या लोकांचा गल्ला सुध्दा वाढत आहे.
कोरोनाच्या भीतीने ग्रामीण भागातील नागरिक शासकीय किंवा चांगल्या दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ करतायत आणि याचाच फायदा घेत हे बोगस डॉक्टर आता कोरोना संशयितांवर सुद्धा उपचार करतायत
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पान रांजणगाव येथील बंगाली डॉक्टर थेट इंजेक्शन आणि सलाइन सुद्धा लावतो. एवढच नाही तर रुग्णाला पाहून कोरोना आहे की नाही हे सुद्धा मला कळत असल्याचा दावा करतो.
असे बोगस डॉक्टर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या कित्येक वर्षांपासून आहे, मात्र आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्यावर कोणतेही कारवाई होत नाही. पण किमान कोरोना सारख्या काळात त्यांना लगाम घातला नाही तर, भविष्यात ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढीत या बंगाली डॉक्टरांचा खारीचा वाटा राहील हे मात्र निश्चित.