बंगाल, IT सेल, भक्त आणि आपण..
X
पाच राज्यासह पश्चिम बंगाल विधानसभेचा निकाल लागला. निकाला पाठोपाठ हिंसाचाराचे फोटो आणि व्हिडिओ वायरल होऊ लागले. मला सोशल मीडिया वरून लोक विचारू लागले तुम्ही बंगालच्या हिंसाचारावर गप्प का? भाजपचा आयटी सेल कडून आलेल्या या माहितीवर मी तातडीने प्रतिक्रिया का व्यक्त करत नाही? कन्हैया कुमार, दिल्लीचं शेतकरी आंदोलन आणि कोरेगाव-भिमा दरम्यान नेमकं काय झालं होतं?
बांगलादेश आणि आसामचे व्हिडिओ पश्चिम बंगालमध्ये कसे आले? इंडिया टुडे यांच्या पत्रकाराने मी जिवंत आहे असं का जाहीर केलं? पश्चिम बंगाल संदर्भात आलेले मारहाण बलात्काराचे 70 टक्के फोटो आणि व्हिडिओ फेक असल्याचे सिद्ध झाले आहे. उर्वरित 30 टक्क्यामध्ये फक्त तृणमूल काँग्रेस आहे का इतर पक्षांचाही सहभाग आहे.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीला हिंसाचाराची पार्श्वभूमी आहे का? भाजपने हिंसाचाराची पार्श्वभूमी तयार केली का? तृणमुलचाही यामध्ये सहभाग आहे का? भाजप आणि संघ परिवाराचा एकच अजेंडा, प्रोपोगंडा काय असतो याविषयी 'ऑन-द-व्हिल' सांगतायहेत डॉ. संग्राम पाटील...