Home > News Update > संयुक्त महाराष्ट्रासाठी पुण्यातील बेळगावकरांचा पुढाकार

संयुक्त महाराष्ट्रासाठी पुण्यातील बेळगावकरांचा पुढाकार

संयुक्त महाराष्ट्रासाठी पुण्यातील बेळगावकरांचा पुढाकार
X

संयुक्त महाराष्ट्राची धगधगती जखम ६५ वर्षानंतरही भरुन निघाली नाही. कर्नाटक सीमावासीयांचा हा लढा आजही सुरु आहे. १ नोव्हेंबर रोजी मराठी बहुल सीमा भार कर्नाटक राज्यात समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ बेळगावरांनी पुण्यात बॅनरबाजी करुन लक्ष वेधले आहे.



गेली ६५ वर्षे सीमाभागातील लोक बेळगाव, निपाणी ,कारवार,बिदर,भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी लढत आहेत. सुरवातीच्या काळात महाराष्ट्रातील लोक यामध्ये सहभागी होते पण हळूहळू महाराष्ट्रातील लोकांचा यात सहभाग कमी झाला आणि महाराष्ट्रासाठी हि चळवळ फक्त राजकीय स्वरूपाची राहिली. पण हि चळवळ राजकीय नसून ती लोक चळवळ असल्याची जाणीव महाराष्ट्राला होणे गरजेचे आहे.




बेळगावच्या पुढे महाराष्ट्रात सांगली , कोल्हापूर सोडल्यास फारसे या लढ्यात लोक सहभागी होत नाहीत पण यंदा पुन्हा एकदा या लढ्याचा आवेश महाराष्ट्रात जागृत करण्यासाठी पुण्यातील बेळगाव मित्र मंडळ ट्रस्ट यांनी पुढाकार घेतला आहे . पुण्यातील प्रमुख अश्या कोथरूडच्या कर्वे चौकात, अभिनव चौक, विद्यापीठ चौक, सेनापती बापट रोड , जंगली महाराज रोड, डांगे चौक या सह पुण्यातील राजकीय पक्ष्यांच्या कार्यालयासमोर देखील संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी बॅनर लावण्यात आले आहेत.





अश्याप्रकारे पुण्यात ५० ठिकाणी बॅनर असून यासाठी बेळगाव मित्र मंडळ ट्रस्ट च्या कार्यकर्त्यानी श्रम घेतले आहेत. १ नोव्हेंबर या दिवशी मराठी बहुल सीमाभाग हा मुंबई प्रांतातून काढून आताच्या कर्नाटक राज्यात समाविष्ट करण्यात आले. लाखो सीमावासीय मराठी जनतेवर अन्याय केला व अजूनही संयुक्त महाराष्ट्र अपूर्ण असून लवकर तो पूर्ण व्हावा यासाठी महाराष्ट्रातील लोकांमध्ये जागृती करण्यासाठी पुण्यातील बेळगावकरांनी पुढाकार घेतला आहे.

Updated : 31 Oct 2021 5:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top