RSS मुळेच मणिपूरचं दंगलभूमीत रुपांतर, केरळच्या मुख्यमंत्र्यांचं टीकास्र
X
गेल्या 80 दिवसांपासून मणिपूर धगधगतं आहे. त्यावर अजून नियंत्रण मिळालेलं नाही. त्यातच आता या मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीला संघाचा अजेंडा कारणीभूत असल्याची टीका केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी केली आहे.
गेल्या अडीच महिन्यांपासून मणिपूरमध्ये मैतई विरुद्ध कुकी हा संघर्ष सुरु आहे. त्यातच 200 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापार्श्वभुमीवर दोन मुलींना नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
पी विजयन यांनी निवेदन जारी करत म्हटले आहे की, देशातील लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष समाजाने हे लक्षात घेतलं पाहिजे की, संघ परिवाराच्या अजेंड्यामुळे मणिपूरचं दंगलभूमीत रुपांतर झालं आहे. संघाने तिथं धार्मिक द्वेषाची पेरणी केली. त्यामुळे तिथे ख्रिश्चन आणि आदिवासी समुदायाला टार्गेट केलं जात आहे. तसेच मणिपूरमधून दररोज अनेक घटना समोर येत आहेत. हिंसाचाराच्या सुरुवातीच्या दिवसांमधील व्हिडीओ सध्या समोर आले आहेत. कुकी समुदायातील महिलांना जमावाने अत्यंत घृणास्पद वागणूक दिली. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राबविलेला अजेंडा कारणीभूत असल्याचा आरोप पी विजयन यांनी केला.