Home > News Update > निवासस्थानी जाण्याआधी जरांगेंनी घेतली, गोदा पट्ट्यातील आंदोलकांसोबत बैठक

निवासस्थानी जाण्याआधी जरांगेंनी घेतली, गोदा पट्ट्यातील आंदोलकांसोबत बैठक

निवासस्थानी जाण्याआधी जरांगेंनी घेतली, गोदा पट्ट्यातील आंदोलकांसोबत बैठक
X


बैठकीचे कारण?

जालना : राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने सुरु असलेल्या लढयाला अखेर काल यश प्राप्त झाले. राज्य सरकारने मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटीन यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्याच्यामुळे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस घेत उपोषण सोडले. संपूर्ण मराठा समाजात यानंतर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. जागोजीगी पेढे, साखर दूध वाटून, गुलाल उधळून हा आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

सरकार जो पर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत घराच्या उंबर्‍यावर पायदेखील ठेवायचा नाही, असा निर्धार मनोज जरांगेंनी केला होता. त्यामुळे ते घरी कधी येणार याची सर्वजण अतुरतेने वाट बघत असतानाच मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे गोदा पट्ट्यातील आंदोलकांसोबत बैठक बोलावली आहे. आज दुपारी १२ वाजता ही बैठक होणार आहे.राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश मिळ्यानंतर सर्व मराठ्यांची एक विजयी सभा आयोजित करण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती. त्यानुसार आज बोलावण्यात आलेल्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे. विजयी सभा कुठे आयोजित करायची, कधी करायची यावर चर्चा होणार आहे. या बैठकीत गोदा पट्ट्यातील प्रमुख मराठा आंदोलक उपस्थित राहणार असून सर्वांच्या चर्चेनंतर यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

Updated : 28 Jan 2024 11:22 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top