Home > News Update > MIDC साठी बीडमध्ये हलगी कडाडली, युवकांचा सरकारविरोधात एल्गार

MIDC साठी बीडमध्ये हलगी कडाडली, युवकांचा सरकारविरोधात एल्गार

MIDC साठी बीडमध्ये हलगी कडाडली, युवकांचा सरकारविरोधात एल्गार
X

गेल्या अनेक वर्षांपासून बीडच्या MIDC चा प्रश्न सरकार दफ्तरी धुळखात पडलाय. त्यामुळे जमीन अधिग्रहण होऊनही बीडच्या तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये जावं लागत असल्यानं बीडच्या तरुणांमध्ये संताप आहे.

बीड जिल्ह्यातील नागरिकांकडून एमआयडीसीसाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यात आलंय. पण याठिकाणी रोजगाराच्या संधीच नाहीत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील युवकांना इतर जिल्ह्यात स्थलांतर करावं लागत आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील एमआयडीसीसाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी करत युवक आक्रमक झाले आहेत.

बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूरांचे स्थलांतर थांबवा, असं म्हणत बीडच्या युवकांना बीडमध्येच रोजगार मिळावा यासाठी राष्ट्रीय क्रांती सेनेच्या परमेश्वर मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी वर्षभरात एमआयडीसीसंदर्भात उपाययोजना केली नाही तर बीड जिल्हग्यात मंत्र्यांना जिल्हाबंदी करू, असा इशाराही देण्यात आला.

बीड जिल्हा दुष्काळी जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील युवकांना इतर जिल्ह्यात जाऊन काम करावं लागतं. त्यामुळे आता सरकारने बीड जिल्ह्यातील युवकांना बीडमध्येच रोजगार देण्यासाठी एमआयडीसीला पॅकेज देऊन बीडच्या युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवायला हवा.


Updated : 21 Aug 2023 8:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top