Home > News Update > विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांची २५ किलोमीटर पायी दिंडी...

विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांची २५ किलोमीटर पायी दिंडी...

विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांची २५ किलोमीटर पायी दिंडी...
X

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील शेतकरी पिक विमा आणि अतिवृष्टी अनुदानाच्या रक्कमेपासून आजही वंचित आहेत. चार महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या सरकाराने शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्क्कम जमा केली असल्याचे ओरडून माध्यमांसमोर आणि मिडीयासमोर सांगितले होते. मात्र आजही बीडमधील शेतकरी पिक विमा आणि अतिवृष्टीच्या रकमेपासून वंचित आहे.

त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हक्काची मदत मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आडस ते केज अशी २५ किलोमीटर पायी दिंडी काढून आपल्या निवेदनाचे गाठोडे तहसीलदारांपुढे ठेवले. अंगावरील कपडे आणि टोपीवर मागण्या तसचं डोक्यावर गाठोडं घेऊन शेतकऱ्यांनी 25 किलोमीटरची पायी दिंडी काढली होती. या दिंडीमध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या सोबत आणलेले निवेदनाचे गाठोडे तहसिलदारांसमोर ठेवले. याअगोदर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोठ्याप्रमाणात घोषणाबाजी केली. गतवर्षी झालेल्या नुकसानीची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस सरकारने शेतकऱ्याचं गाऱ्हाणे ऐकून मदत द्यावी. अशी मागणी या दरम्यान शेतकऱ्यांनी केली. आणि आपल्या मागण्यांचे निवदेन तहसिलदारांकडे दिले.

Updated : 13 Jan 2023 3:58 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top