बीड मध्ये पाच नगरपंचायतीच्या 20 जागांसाठी 86 उमेदवारांची परीक्षा...!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाअंतर्गत बीड जिल्ह्यातील 25 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून तगडा फौज फाटा दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 18 Jan 2022 3:08 PM IST
X
X
बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा शिरूर केज आणि वडवणी या पाच नगरपंचायतीच्या 20 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु आहे. पाच नगर पंचायतीतील एकूण 86 उमेदवार रिंगणात तर 14858 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. प्रत्येक नगरपंचायतीत राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला आहे. पोलिसांकडून सर्वच केंद्रावर ती तगडा बंदोबस्त तैनात आला आहे. नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला मात्र दुसऱ्या टप्प्यामध्ये बडे नेते प्रचाराला दिसले नाहीत असं असलं तरी प्रत्येक पक्षानं आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवत जिंकण्याचे प्रयत्न साठी प्रयत्न केले. आज सकाळ पासून मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
Updated : 18 Jan 2022 3:08 PM IST
Tags: beed beed election
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire