Home > News Update > गुजरातच्या आडमुठेपणामुळे महाराष्ट्राची नदीजोड प्रकल्पातून माघार, श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत सांगितले कारण..
गुजरातच्या आडमुठेपणामुळे महाराष्ट्राची नदीजोड प्रकल्पातून माघार, श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत सांगितले कारण..
editor | 9 Dec 2021 3:30 PM IST
X
X
गुजरातने महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी दिले नाही म्हणून महाराष्ट्राने नदीजोड प्रकल्पातून माघार घेतली, अशी माहिती शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत दिली आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा नदीजोड प्रकल्पावर वेगाने कामाला सुरूवात केली आहे. या मुद्द्यावर गुरूवारी लोकसभेत चर्चा झाली. या चर्चे दरम्यान शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी देशात दरवर्षी येणाऱ्या पुरांचा मुद्दा मांडला. तसेच या मुद्द्यावर सरकारने एक राष्ट्रीय गट बनवून एकत्रितपणे काम करावे अशी मागणी गेली. यावर केंद्रीय मंक्षी गजेंद्रसिंह शेखावत यांनी उत्तर देत राज्यांनी आपापसातील वाद मिटवून या राष्ट्रीय प्रकल्पात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
Updated : 9 Dec 2021 8:40 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire