दोन वर्षात बार्टीची नेत्रदिपक कामगिरी :कुलदीप आंबेकर
X
पदावर असताना काही मंडळीची किंमत आपणांस कधी कळत नाही,ते कोणतीही क्षेत्र असो.काही पदामुळे ओळखतात,तर काही संस्थेच्या नावाने. बार्टी संस्था सद्या ओळखली जाती किंवा झपाट्याने कात टाकतेय दोन वर्षात बार्टीची नेत्रदिपक कामगिरी सांगताहेत कुलदीप आंबेकर...
लोककवी वामनदादा कर्डक म्हणतात,"भीम तुझ्या मताची जर पाच लोक असती तर तलवारीच्या तयाचे न्यारेच टोक असते".त्याच विचाराचा वसा व वारसा घेउन आतापर्यतच्या बार्टीच्या प्रगतीत सरांचे मोलाचे योगदान दिले आहे.हे कौतुकस्पद व अभिमान वाटवं अशी बाब आहे.
पण अधिकारी कीतीकाळ राहीले, यापेक्षा पदावरती असलेल्या कालावधीत कीती व कशी कामे केले,हे पाहणे अपेक्षित व गरजेचे असते.तेच काम अतिशय योग्य व चोख समतोल राखुन गजभिये सरांनी केले आहे.
परंतु अशावेळी कमी काळात सर्वाकडुन अपेक्षा जास्तच असतात.वरीष्ठाचे,राजकीय पक्ष,संघटना यांचे दबाबतंत्र असते,यावरही मात करुन निर्भीडपणे काम करावं लागते.ते गजभिये सर करत आलेत.त्याचे कारण त्याचा पारदर्शक व गुणवत्ता यावरती असलेला अधिकचा भर..
बार्टीचा महासंचालक पदाचा कारभार स्विकारुन धम्मज्योती गजभिये सर यांना दोन वर्ष पुर्ण झालीत.त्यांच्या कार्याकाळातील कामकाजाचा आढावा पाहता एक लक्षात येते,
ते प्रामाणिक,कर्तव्यदक्ष आणी दुरदृष्टी असणारे अधिकारी आहेत.विद्यार्थीच्या प्रश्नाची नस ओळखुन मार्ग काढणारे आणी नवी दिशा दाखवणारे आहेत.तसेच तरुणांसाठी नवनवीन संकल्पना,उपक्रम घेणारे आहेत.
त्याचबरोबर प्रशासनातील,राजकीय,सामाजिक संस्था,संघटना यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवणारे आणी जोपासणारे आहेत.
वर्षानूवर्ष बार्टीकडे साधारण लोकांची पाहण्याची जी प्रतिमा होती,तिला पारदर्शक करण्याचे काम गजभिये सरांनी केले आहे,ही मोठी त्यांची जमेची बाजु आहे.यासाठी त्यांना कसरतही करावी लागली.अजुनही ते करतच आहेत.
कारण पारंपारिक चौकटीत आणी नकारात्मक पाहणार्या मंडळींना कृतीतुन छेद देणे हे कठीण काम असते.कमी कालावधीत हे सरांनी करुन दाखवलं.
बार्टी स्वायंता संस्था जुनी असली तरी तिथे प्रशासकीय पातळीवर पुर्व कधी एवढया वेगाने कामे होत नव्हती.पण गजभिये सर आल्याने हे परीवर्तन मोठया प्रमाणात होत आहेत.
काळानुरुप होणारे व्यवसाय,रोजगार,कौशल्य विकास यामधील संधी कशामध्ये आहेत तसेच विद्यार्थीचा कल पाहुन प्रशिक्षण विभाग सुरु केलेत.महत्वकांक्षी योजनाही अजेंड्यावर घेतलेत.
एवढेच नव्हे तर संशोधनाच्या माध्यमातुन बार्टीने ग्लोबल दिशेने वाटचाल सुरु केलीय...
युगप्रवर्तक डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृतीशील विचारांचा वसा व वारसा घेउन जाणार्या मोजक्याच अधिकार्यात ते ही कमी कालवधीत गजभिये सरांनी ठसा उमटवला आहे.त्यांची ही वाटचाल समाजाला विशेषत;तरुणांना दिशादर्शक ठरणार आहे.
यात तीळमात्र शंका नाही..
कुलदीप आंबेकर
अध्यक्ष स्टुडंट हेल्पींग हँडस