बीएआरसीचा अर्नबला दणका
समाजविघात वृत्तांकन करुन सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी सातत्याने वादात सापडत असून आता त्यांनी टीव्ही व्यूअरशिप रेटिंग एजन्सीचे (बीएआरसी) गोपनीय ईमेल उघड केल्यानं बीएआरसीनं रिपब्लिकला कडक शब्दात खडसावले आहे.
X
टिआरपी घोटाळ्याच्या चौकशीवरुन आकाडतांडव करणाऱ्या रिपब्लीक टिव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी पुन्हा एकदा वादात सापडले आहे. मुंबई पोलिस आयुक्त परमबीस सिंह यांच्यावर आरोप करण्यासाठी रिपब्लिकने बीएआरसी आणि वाहीनीतील ईमेल संवाद सार्वजनिक केल्याची गंभीर बीएआरसीनं घेतली असून सध्याच्या पोलिस कारवाईबद्दल आम्ही कोणतेही भाष्य केले नसून रिपब्लिकनं खोडसाळपने वृत्तांकन केल्याचं म्हटलं आहे.
टिआरपी वाढवून स्वतःकडे लक्ष ओढून घेण्यासाठी आक्रस्ताळ्या पत्रकारीतेचा आरंभ केलेल्या रिपलब्लीक टिव्ही पुन्हा एकदा तोंडावर पडली आहे. पालघरच्या साधु हत्याकांडानंतर सातत्याने अजेंडाआधारीत रिपोर्टींग करणाऱ्या रिपब्लिकनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिसांना लक्ष केलं आहे. मुंबई पोलिसांनी टिआरपी घोटाळा शोधल्यानंतर रिपब्लीकचा तिळपापड झाला आहे. यासंदर्भात रिपब्लिक टीव्हीने BARC चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील लुल्ला आणि रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांच्यात ईमेल संभाषणात रिपब्लिकला क्लिनचीट दिल्याचा दावा केला होता.
रिपब्लिक टीव्हीच्या दाव्याला उत्तर देताना बीएआरसी कडून आलेल्या ईमेलने चॅनेलला कोणतीही क्लिनचिट दिली नसल्याचे सांगितले आहे. एजन्सीने रिपब्लिकच्या हि कृती (संभाषण सार्वजनिक करण्याची "अत्यंत निराशाजनक" असल्याचे म्हटलं आहे. टीव्ही व्यूअरशिप रेटिंग एजन्सी बीएआरसी इंडियाने रिपब्लिक टीव्हीवर खासगी आणि गोपनीय संप्रेषणाचे चुकीचे वर्णन केल्याचा आरोप केला आहे. रेटिंगच्या हेरफेरच्या कथित आरोपांबाबत सध्या सुरू असलेल्या तपासावर कोणतेही भाष्य केले नाही असं म्हटलं आहे.
टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) हेराफेरी प्रकरणात पोलिसांनी सुरू असलेल्या चौकशीत ते सहकार्य करीत असल्याचे ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिलने (बीएआरसी) निवेदनात म्हटले आहे. या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. अभिनेता सुशांतसिंग आत्महत्येची पुष्ठी भारतीय आयुविज्ञान संस्था (AIMS)नं केल्यानंतर रिपब्लिकनं अशा पध्दतीने सुधीर गुप्ता यांच्या विरोधात वृत्ताकंन केलं होते.